प्रति,
पुनित दादा बालन,
ऊत्सवप्रमुख,
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी
गणेशोत्सव ट्रस्ट, पुणे,
स. न. वि. वि.
पत्र लिहण्यास कारण की,
आपल्या मराठी भाषेमध्ये मध्ये एक म्हण आहे.
"संकटसमयी जो मदत करतो तोच खरा मित्र"....."दादा तुच तो पुणेकरांचा मित्र"... जो संकटसमयी पुणेकरांचा पाठिशी एका थोरल्या भावाप्रमाणे ऊभा राहिला.....
प्रत्येक सुपरहिरो ला एका सुपर शक्ती ची गरज असते. करोना महामारीच्या काळात जनसेवक रुपी असणाऱ्या ब-याच सुपरहिरोंना एका सुपर शक्ती ची गरज होती. आणि ती सुपर शक्ती म्हणजे करोना चा काळात पुण्यासोबत महाराष्ट्रातील नागरिकांना भरघोस सढळ हाताने मदत करणारे नाव म्हणजे पुनित दादा बालन.
लाॅकडाऊन चालु झाल्यापासून दररोज हजारो नागरिकांना, पोलिस बांधवांना आणि पोलीस मित्रांना स्वखर्चाने टि शर्ट , फेस शिल्ड ,पाणी बाॅटल्स, सॅनिटाइजर वाटप, दररोज मोठ्या प्रमाणात गरजुंना अन्नदान , पडद्यामागच्या 450 कलावंतांना
7. 50 लाख रुपये ची मदत , पुणे शहर आणि जिल्ह्यातील रोजावर काम करणाऱ्या गरजु लोकांना 25,000 शिधा किटचे वाटप, स्पेशल रेल्वे ने गावाला जाणाऱ्या कामगारांना मोफत पाणी आणि दुध वाटप पुनित दादा बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले. लाॅकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात एकाच वेळी शहरातील 2500 वृत्तपत्र विक्रेत्यांना शिधावाटप, विनामूल्य करोना पुर्व तपासणी शिबिरे, सर्व पत्रकार, न्युज रिपोर्टर, छायाचित्रकार यांना हजारो संख्येने मास्क आणि फेसशिल्ड वाटप करण्यात आले. पुण्यातील पत्रकार, फोटोग्राफर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची मोफत स्वतः टेस्ट, अत्यावश्यक सेवेत काम करीत असलेल्या 200 रिक्षा चालकांचे मोफत मेडीकल विमा एवढेच नव्हे तर मदतीला धावून येणा-या करोना योध्दांसाठी रोख पारितोषिके आणि आॅनलाईन गणेशोत्सवाची सुरवात त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळातर्फे यशस्वी रीत्या आपल्या संकल्पनेनी यशस्वी राबवून दाखवली. प्रत्येक स्तरामधील गरजु कुटुंबांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता माणुसकी चे दर्शन देणारा आणि सढळ हाताने मदत करणारा पुणेकरांच्या संकटसमयी धावुन जाणारा संकटमोचन थोरला भाऊ म्हणायला आम्हा पुणेकरांना जरुर आवडेल.
आपल्या कार्याचा लेखाजोखा ईतका मोठा आहे. की केवळ एका लेखात केलेले कार्य लिहणे शक्य नाही तर कमीत कमी 100 पानांचे एक पुस्तक लिहायला लागेल. केवळ करोना काळात नव्हे तर ईतर वेळी आपण इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे नेहमीच गरजूंची मदत करत आलेले आहात. केवळ पुणे आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित न रहाता काश्मीर च्या खोरे पर्यंत आपण लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात दिलेला आहे. एक रुपया कमवल्यास 30 पैसे समाज कार्यासाठी खर्च करण्याची आई इंद्राणी बालन यांनी दिलेली शिकवण आपण आजसुद्धा अभिमानाने जपता.
यशस्वी उद्योजक असले तरी, पाय जमिनीवर असलेला माणूस काय असतो याचे उदाहरण म्हणजे दादा स्वतः आपण. पुणेकरांना एक हक्काचा थोरला भाऊ आणि ज्येष्ठांना एक मानसपुत्र आपल्या रुपाने मिळाला आहे. आपल्या या अगणित कार्यामुळे पुनित दादा बालन हे नाव पुण्यातील घराघरात पोहोचले आहे.
किनाऱ्यावर बसुन मासे पकडण्यापेक्षा खोल समुद्रात जाऊन मासे पकडण्याचे जाळे जो फेकतो तो खरा हिरो असतो.
याचप्रकारे महामारी च्या काळात स्वतः उद्योजक असल्याचा टॅग बाजुला सारुन फिल्डवर उतरुन , स्वतः जातीने लक्ष घालून काम करणारे आपले कार्य कौतुकास्पद आहे .
अशा या आमच्या हक्काच्या थोरल्या भावाला, सर्व पुणेकर बांधवांकडुन आपणांस आणि आपल्या अगणितिक मदतीला सलाम..... सलाम..... सलाम.....
कळावे,
आपला लहान भाऊ
एक तरुण पुणेकर
संकल्पना
आकाश इंगवले
लेखक
गिरीश भोसले
टिप्पणी
पुनित दादा बालन आणि माझा कोणत्याही प्रकारचा परीचय नसुन केवळ फक्त त्यांनी या काळात न भुतो न भविष्यातो केलेल्या कार्याचे वर्णन करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सदर लेख एक तरुण पुणेकराच्या नजरेतुन लिहलेला आहे.
