प्रिय
गणेश मंडळ कार्यकर्ते
बांधव,
रा. घराघरात..... मनामनात
तुमच्या सारखा मी पण एकेकाळचा, एक वयस्कर पण मनाने तरुण असलेला पुण्यातील मंडळाचा एकवेळेचा कार्यकर्ता.
करोना सारखे महाभयंकर संकट जगावर असताना आपण महाराष्ट्रातील (खास करुन पुणे आणि मुंबई येथील) गणपती मंडळाच्या कार्यकर्ते बांधवांनी सरकारने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करुन समाजासमोर जो आदर्श ठेवला आहे. तो वाखाण्याजोगा आहे. तूमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. शारीरिक अंतर राखत आणि मंडळाच्या सहाय्याने सामाजिक कार्य करत करोना रोगाशी लढण्यासाठी तुम्ही जी सामान्यी नागरिकांना मदत करत आहात त्या कार्यातच आणि त्या सेवेतच गणपती बाप्पा विराजमान आहे.
आपल्या भावनांवर आवर घालून केवळ समाजाप्रती असलेल्या काळजीपोटी आपण जो साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे त्यातच दिसुन येत आहे की आपला विघ्नहर्ता आपल्या लेकरांना या त्रासातून लवकरच मुक्त करेल.
मला या आधी वाटतं होतं की गणपती बाप्पा फक्त दहा दिवस आपल्या घरी आणि मांडवात असतो पण..... तुमच्या सारख्या जनसेवा करणारे मित्रांना पाहिल्यावर बाप्पा तुमच्या मध्ये च मानवाच्या रुपात असतो याची खात्री झाली.
आपल्या भावनांना, भक्तीला आणि आपल्या जनसेवेला मानाचा मुजरा......
सर्व कार्यकर्ता बांधवाना सदर पत्र अर्पण
धन्यवाद.
कळावे,
प्रेषक
आपल्या वर
प्रेम करणारा
ज्येष्ठ नागरिक
टिप्पणी- सदर लेख एक ज्येष्ठ नागरिक काकांच्या नजरेतुन लिहला आहे. जो सदैव कार्यकर्ता बांधवांचा चाहता आहे.
संकल्पना आणि लेखक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा