मंगळवार, २८ मे, २०२४

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...




छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच असे प्रकार घडल्यावर आपण पुणेकर असल्याची लाज वाटती आहे सध्या. कारण देशात नाव बदनाम होतय ते माझ्या पुणे शहराचं.... 

माझ्या स्वप्नातील पुणे शहराबाबत पण माझं एक प्रामाणिक मत आहे

सगळ्यांना पिण्यासाठी आवश्यक प्रथम पाणी मिळायला पाहिजे.... बसमध्ये धक्के नको तर जागा मिळायला पाहिजे. मेट्रो च तिकीट स्वस्त व्हायला पाहिजे. एखादा व्यक्ती आजारी पडल्यावर त्याला ससुण रुग्णालयात खाजगी रुग्णालयासारखी चांगली व्यवस्था मिळाली पाहिजे.  ससुण मध्ये खरे रिपोर्ट मिळाले पाहिजे. पब चा एवजी मोफत शिक्षण संस्था उघडल्या पाहिजे. गडकिल्यांच संवर्धन व्हायला पाहिजे. आयटी हब पेक्षा झाडांचं शहर म्हणून घ्यायला मला नक्की आवडेल. होर्डिंग्ज आणि फ्लेक्स संकल्पना बंद केली पाहिजे. दिवाळी पहाट ला सारसबागेतले अपप्रकार थांबले पाहिजेत. कर्णकर्कश्श साउंड आणि लेझर लाईटवर निर्बंध असले पाहिजे. रेल्वे स्थानकावरच वायफाय फुकट नसलं तरी चालेल पण मुतारी साठी ५-५ रु. आकारणे बंद केले पाहिजे. सरकारी शिपाई पासून आयुक्त पर्यंत  सर्व सरकारी कर्मचारी भष्टाचारी नसले पाहिजे. शिवाजीनगर न्यायालयात पार्किंग ची सोय मोठी पाहिजे. मेट्रो ची कामांमुळे त्रास व्हायला नको. कोयता गॅंग संपुष्टात आली पाहिजे. भिकारीमुक्त शहर पाहिजे.
झोपडपट्टी नसली पाहिजे. कॅनोल फुटला नाही पाहिजे. होर्डिंग्ज पडुन अपघात व्हायला नाही पाहिजे. जोशी अभ्यंकर खुनाचा ईतिहास मिटला पाहिजे. नगरसेवक आमदार खासदार जण माणसातले पाहिजे. खाजगी शाळांचा फिया आटोक्यात आली पाहिजे. कचरा प्रश्न सुटला पाहिजे. रिंग रोड  आणि ईंटरनेशनल विमानतळ पाहिजे. भव्य दिव्य ऐतिहासिक नाना वाडा झाला पाहिजे. मुळा मुठाला  'नदीचं' रुप आलं पाहिजे. बस ची संख्या वाढली पाहिजे.
सिग्नल पाळणारे पुणेकर असावेत 
बास एवढीच अपेक्षा आहे पुणे शहर कसं असावं याची..... कारण सिग्नल वरुन देश ओळखला जातो.....

शनिवार, १५ जुलै, २०२३

एकनिष्ठ चं दुसरं नाव म्हणजे संजयदादा बालगुडे

*एकनिष्ठ चं दुसरं नाव म्हणजे संजयदादा बालगुडे..... 🤝🏻*


 *सलग विक्रमी 16 वर्षांपेक्षा जास्त एका राष्ट्रीय पक्षाचं शहराचं अध्यक्षपद यशस्वीपणे भूषविणं आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे म्हणजे शिवधनुष्य🏹 ऊचलण्याजोगं आहे..... *
 
*ही किमया 90 च्या दशकात राजकीय वारसा असलेला नव्हे तर सर्वसामान्य घरातील तरुणाने करून दाखवली..... 👨🏻*

काही पदं अशी असतात की त्या पदावर असेपर्यंत त्या व्यक्तीची ओळख असते... पण काही संघर्षयोध्दे आपल्या कार्याने त्या पदाला ईतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात की , समाजच त्या व्यक्तीला ते पद कायमस्वरूपी बहाल करतो.... 

*नाव - संजय दिगंबर बालगुडे ऊर्फ अध्यक्ष*

*अध्यक्षांच्या पदांची आणि कामाची ओळख जर करून द्यायची म्हणली तर कमीत कमी 300  पानाचं पुस्तक 📓तर नक्कीच लिहायला लागेल.....*

अध्यक्षांचं शालेय शिक्षण खेळासाठी आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र मंडळ येथे झाले...... त्यानंतर माॅडन महाविद्यालयात असताना राजकारणात प्रवेश केला. *वयाच्या 23-24व्या वर्षी च आपल्या पुण्यनगरी च्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थ पणे विक्रमी 16 वर्षे सांभाळली.....*
पुणे शहराचं हृदय समजले. जाणाऱ्या स्वारगेट जवळ असणाऱ्या खडक माळ आळीत त्यांचे वास्तव्य...🏠 प्रसिद्ध अभिनेते निळु फुले हे त्यांचे शेजारी ...


युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना 16 वर्षात देशपातळीवर आणि राज्यात काॅंग्रेस, शिवसेना भारतीय जनता पक्षाची  सत्ता असताना पुणे महानगरपालिकेवर सतत काॅंग्रेस चा झेंडा✌🏻 फडकवत ठेवण्यामागे सर्वात मोठा हात हा अध्यक्षांचा होता.1985 साली अगदी कमी वयात महापालिकेच्या निवडणूकीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला....पण शांत बसेल तो जंगलाचा राजा कसला...आपले सामाजिक कार्य त्यांनी अजुन जिद्दीने सुरू ठेवले.1997 साली तर विक्रमी मतांनी निवडून येउन त्यांनी महापालिकेत दणक्यात एंट्री घेतली🚶🏻‍♂️..... नुसती एंट्री नव्हती तर अभ्यासु 📖राजकारणी व्यक्तीमत्व काय असतं याची ओळखच करून दिली. अनेक भष्टाचार💰, घोटाळे 💵तर बाहेर काढलेच *पण  राज्यातील एका सर्वात मुख्यमंत्री असणाऱ्या मनोहर जोशी यांना सुध्दा गिरीश व्यास प्रकरणात राजीनामा📄 द्यावयास लागला पाडले....युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना एक नव्हे तर दोन वेळा खुद्द पंतप्रधान राजीव गांधी साहेब आणि पी. नरसिंहराव साहेब त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते..... शेकडो मुलांना पीएमटी  आणि महापालिकेमध्ये भरती 1 रुपया ही न घेता केली...अध्यक्ष पुणे शहर युवक काँग्रेस १६ वर्ष ,PMT अध्यक्ष, 🚌*
नगरसेवक पुणे मनपा, सचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसमहाराष्ट्र प्रदेश कांग्रेस संघटनेच्या माध्यमातून विविध तालुका, शहर नगरपालिका येथे निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. 
*राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रामकृष्ण मोरे हे अध्यक्षांचे प्रेरणास्थान....👏🏻*


खडक सार्वजनिक गणेशोत्सवाच मंडळाचे ते अध्यक्ष.....एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक असा प्रवास करणारे अध्यक्ष हे पुणे शहरातील पहिलेच उदाहरण असेल....गणेशोत्सवात असा एक पण भक्त नसेल जो या मंडळाचे डेकोरेशन पाहिल्याशिवाय🎊🪅 घरी जात असेल... यातच मंडळाच्या देखाव्यांची भव्यता दिसुन येते.... याचे संपूर्ण श्रेय अध्यक्ष स्वत नेहमी सर्व कार्यकरत्यांना देतात.... 

 समाजसेवा करत असताना त्यांना अनेक विविध पुरस्कार मिळाले🥇🏅🎖️ पण महाराष्ट्र शासनाकडुन रक्तदानाविषयीचा🩸 विशेष कार्याचा  पुरस्कार🏆 त्यांना सन्मानित करण्यात आले.... क्रिकेट,🏏 सायकलिंग🚴🏻‍♂️, पोहणे ,🏊🏻‍♂️शरीरसौष्ठव 💪🏻हे त्यांचे आवडते क्रिडाप्रकार .... आज पण वयाची 50 ओलांडल्यानंतर सुध्दा कोणी तरुण अथवा लहान मुले क्रिकेट खेळताना दिसल्यास त्यांना क्रिकेट 🏏खेळण्याचा मोह ते टाळू शकत नाही....दरवर्षी ते क्रिडा प्रकार 🚴🏻‍♂️💪🏻🏏आणि कला🎭🎨🎬🎤  स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित  करतात....

आयुष्यामधील 40 वर्षापेक्षा जास्त केवळ एकाच पक्षाशी एकनिष्ठ राहुन केलेले काम आणि सेवा ही खरीच वाखण्याजोगी आहे. कुठल्याही कामाची जाहीरात 📄न करता कामाचे सातत्य ही त्यांच्या कामाची ओळख...... कार्यकर्त्यांच्या मनातील गोष्ट ओळखणारा नेता म्हणजे अध्यक्ष  संजय दादा बालगुडे.... 👑

असे हे पुण्यनगरी साठी झटणारे दमदार अभ्यासु नेतृत्व भविष्यकाळात महाराष्ट्रातील विधानमंडळात दिसणार यात तिळमात्र शंका नाही.... आणि तेवढ्याच ताकदीने अष्टपैलू असलेले हे व्यक्तिमत्त्व विधिमंडळ सभागृहात आपल्या भाषणाने आणि वक्तृत्वाने दणाणून सोडावे हीच सर्व कट्टर पुणेकरांची मनस्वी ईच्छा आहे. 

आज अध्यक्षांचा वाढदिवस....त्यानिमित्ताने आपणास #शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची #भव्यता, पुरंदरची #दिव्यता, सिंहगडाची #शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!🚩 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! या सदिच्छा...🌸👍🏻


लेखाची संकल्पना
उद्योजक गिरीशदादा बालगुडे


माहीती संकलन
युवा नेतृत्व ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे

Written By
Adv. Girish M. Bhosale

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

Reverse Argument ..... उलटा युक्तीवाद

Reverse Argument ........ 


साधारणपणे ७-८ वर्षा पूर्वी ची गोष्ट आहे. विधी च्या ४थ्या वर्षाला शिकत असतानाची गोष्ट... स्थळ आव्हाड लाॅ क्लासेस...... गणेश शिरसाठ सर आपल्या नेहमीच्या शैलीत शिकवत होते.... शिकवत असताना Constitution Validity चा विषयावर सरांच लेक्चर सुरू होते. त्या वेळी सरांनी एक सर्वोच्च न्यायालयातील एका सुप्रसिद्ध वकिलांच उदाहरण दिल होतं ( नाव आठवत नाही पण फली नरीमण नाव असावं) 
कलम भारतीय दंड संहितेच्या एक कलमातील Constitution Validity बाबत अंतिम युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात सुरू होता........... Petitioner चा वकिलांनी सदरचे कलम कसे असंविधानिक आहे यावर युक्तीवाद केला.... आता Constitution Validity म्हणल्यावर मोठा विषय.... त्यामुळे petitioner च्या वकिलांसारखंच respondent च्या वकिलांचा युक्तीवाद मोठा होईल असं सर्वांना वाटत असेल पण झालं ऊलटंच.... 
Respondent चे वकिल साहेबांनी फक्त सदरचे कलम कसे बरोबर आहे किंवा त्याचा फायदा काय आहे हे सगळं लेखाजोखा सांगण्यापेक्षा जर सदरचे कलम रद्द केले तर काय परिणाम घडू शकतात हे केवळ अत्यंत कमी वेळेत आणि  कमी शब्दात मे. न्यायालयासमोर नमूद केलं.. आणि आज पण भारतीय दंड संहितेमधील ते कलम शाबित असुन संविधानिक आहे..... 

गणेश सरांनी त्या वेळी सांगितले होतं  lawyer नी जर एखादी गोष्ट समजून सांगण्यापेक्षा ती जर गोष्ट भविष्यात प्रत्यक्षात झाली तर काय  परिणाम होऊ शकतात हे थोडक्यात लक्षात आणून दिलं तरी पुरेसे आहे.... या युक्तिवादाच्या प्रकाराला Reverse Argument म्हणतात.... 
 
 गणेश शिरसाठ सर यांचा Reverse Argument  कानमंत्र खास मनाई हुकूम आणि निशाणी ५ च्या युक्तीवादा वेळी हमखास कामी येतोय....... 

Thank you Sir

अॅड. गिरीश भोसले

मंगळवार, १९ जुलै, २०२२

short form in daily use in law field

DID - Dismissed in Default
Spl. C. S. - Special Civil Suit
Civil M.A. - Civil Miscellaneous Application
LOD - List of Documemt
V. - Versus
RTS- Record Of Rights
MCOCA- Maharashtra Control of Organised Crime Act, 1999
R and P - Reports and Papers
R. C. C. - Regular Civil Case
CJSD - Civil Judge Senior Division
CJM - Chief Judicial Magistrate
CJJD - Civil Judge Junior Division
WS - Written Statement
IO- investigation officer
IT act - Information technology Act
CPC - Civil Procedure Code
CRPC- Criminal Procedure Code
JMFC - Junior Magistrate First class
ADJ - Assistant District Judge
DJ- District Judge
PP- Public Prosecutor
APP- Assistant Public prosecutor
Adv. - Advocate
Llm- Master of Laws
SCC- supreme Court cases
ILR -Indian law reports
AIR - All India Reporter
SC- Supreme Court
HC - High Court
BSL- Bachelor of social law
LR- legal heirs
Dtl- Diploma in Taxation Law
EXH- Exhibit
OK- All correct
O.-  Order
R. - Rule
S. Or Sec. - Section. 
E. P. - Executive Petition
LLB- Legum Baccalaureus or Bachelor of Law.

रविवार, १० जुलै, २०२२

वकीलांचे वापरातील दररोज चे ईंग्रजी शब्द व त्याचे मराठी नाव

 CPC दिवाणी प्रकिया संहीता

CRPC फौजदारी प्रक्रिया संहीता

IPC भारतीय दंड संहिता

INDIAN EVIDENCE ACT भारतीय पुरावा कायदा

SPECIFIC RELIEF ACT विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम

TRANSFER OF PROPERTY ACT मालमत्ता हस्तांतरण कायदा

INDIAN CONTRACT ACT भारतीय संविदा अधिनियम

PLAINT दावा

COURT न्यायालय

EXHIBIT निशाणी

ORDER आदेश

CERTIFIED COPY -प्रमाणित प्रत

DECREE हुकूमनामा

RULE नियम

PLAINTIFF वादी

DEFENDANT प्रतिवादी

APPELLANT अपिलार्थी

MUTATION ENTRY फेरफार क्रमांक

SALEDEED खरेदीखत

EXECUTION PETITION दरखास्त

SECTION कलम

FIR प्रथम माहिती अहवाल

PROCEEDING कार्यवाही

ISSUES वादमुद्दे

W/S WRITTEN STATEMENT लेखी कैफियत

AFFIDAVIT प्रतिज्ञापत्र

INSOLVENT PERSON दिवाळखोर मनुष्य

INJUNCTION मनाई हुकूम

BAIL जामीन

COGNIZABLE दखलपात्र

NON- COGNIZABLE अदखलपात्र

MOVABLE जंगम

IMMOVABLE स्थावर

DIVORCE - घटस्फोट

 OWNERNERSHIP - मालकी हक्क

ACT कायदा 

CODE संहीता

 Limitation act मुदतीचा कायदा

SENIOR DIVISION - वरीष्ठ स्तर

JUNIOR DIVISION - कनिष्ठ स्तर

Regular - नियमित

Declaration - ठराव

Judgment - न्यायनिर्णय

 Disputed land - वादमिळकत

Advocate - अधिवक्ता

POWER OF ATTORNEY - कुलमुखत्यारपत्र

FILING -  दाखल

Application - अर्ज

Say - म्हणणे (लेखी किंवा तोंडी) 

 POSSESSION - ताबा

माहिती संकलन

अॅड. गिरीश भोसले





सोमवार, १६ मे, २०२२

बहीण सासरी जाताना..... ❤

माझी बहीण.......

 ए तायडे..... 

आईचं दुसरं रुप.... लहानपणापासूनची सोबती..... तरुण झाल्यावरची पहीली मैत्रीण.....हक्कानी भांडणारी..... आणि घरच्यांचा काळजाचा तुकडा... जेव्हा लग्न होऊन माहेरहुन सासरी जायला निघतो.... 

एका डोळ्यात आनंदाचे अश्रु आहेत....... आणि एका डोळ्यात विरहाचे दुख..... एका झटक्यात सगळं लहानपणापासून ते लग्न होण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आणि प्रसंग आठवतात.... 


आई वडीलांचे संस्कार.... शिक्षणासाठीचे घेतलेले तुझे कष्ट.... पहीली पासुन ते दहावी पर्यंत असलेला पहीला नंबर.... तु जेव्हा दरवर्षी स्टेजवर जेव्हा प्रथम क्रमांकाच बक्षीस घ्यायला जायची त्यावेळी  उभ्या राहून अभिमानाने टाळ्या वाजविण्यात वेगळाच आनंद होता....

तुझ्याशी भांडल्यावर मी कितीही अबोला धरला तरी तुच पहीली बोलायची..... 

मुलींनी शिकल्यावर त्या किती ऊंच यशाच्या शिखरावर जाऊ शकतात याचं आपल्या कुटुंबातील पहीलं उदाहरण म्हणजे तु........ आज आपल्या आईवडिलांच्या, ज्येष्ठांच्या आशिर्वादाने आणि शिक्षणाच्या पुण्याईने  संसाराची सुरवात करीत आहेस...

 फक्त तुझा एक येडा भावाला... तुझ्या शिवाय रहायची सवय नाहीये.........  

 तु फक्त खुश रहा...... घरच्यांना सगळ्यांना खुश ठेव....

आजच्या दिवसाची खुप वाट पहात होतो.... आज तो क्षण आलाय.. आज तु कु. गौरीची ची सौ. गौरी होत आहे.... अजुन काय आनंद हवाय एका भावाला..... 

फक्त एक सांगतो तु ज्या वेळी तु त्याला बाळा बोलती ना.,... त्याला सगळं जग मिळाल्यासारखं वाटतं.....

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

हिराबाग ची आठवण ❤

हिराबाग ची आठवण..... 

पुणे शहरातील गणेशोत्सव म्हणलं की हालत्या देखाव्यांची आठवण आवर्जून येणार.... आणि ती आली की तोंडात पहिले नाव येणार ते टिळक रोड च्या हिराबाग मित्र मंडळाचं...... 

हलता देखावा पहावा तर तो हिराबाग मित्र मंडळाचा..... गणेशोत्सवाच्या पहील्या दिवसापासून तुफान गर्दी खेचणारे हे मंडळ.... रामायण, महाभारत, कॄष्णलिला वर आधारित असलेले हलते आणि सुबक देखावे असे असायचे की कायमची आठवण मनात कोरुन रहायची. एकदा का हिराबाग चा देखावा पाहीला परत तो देखावा ती व्यक्ती कधीच विसरू शकत नाही....... 


आम्ही पण 20-22 वर्षें पूर्वी वडिलांचे चुलत्यांच्या खांद्यावर बसुन जास्तीत जास्त वेळा या मंडळाचा देखावा पहायला जायचो..... नरसिंह अवतार आणि दुर्गेचा महाकाली अवतार हे देखावे तर ईतके जबरदस्त होते की लहान मुलांसकट मोठे ही देखावा पहाताना हरवुन जायचे..... श्रीकृष्णाचे विराट रूप या सारखा भव्य देखावा आणि गणेश जन्म आणि हनुमानाचे महाऊड्डाण सारखे तांत्रिक देखावे पण आज पण आवर्जून आठवतात..... राहुल सोलापूरकर यांचा पहाडी आवाज आज पण कानात घुमतो..... 

काही वर्षे झाली काही कारणास्तव हिराबाग मित्र मंडळाचे देखावे बंद झाले..... पण ते फक्त देखावे नसुन आजच्या पुणेकर तरुणांचं बालपण आठवुण देणारे दिवस आहे.....

अॅड. गिरीश भोसले
पुणे

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...