*एकनिष्ठ चं दुसरं नाव म्हणजे संजयदादा बालगुडे..... 🤝🏻*
*सलग विक्रमी 16 वर्षांपेक्षा जास्त एका राष्ट्रीय पक्षाचं शहराचं अध्यक्षपद यशस्वीपणे भूषविणं आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे म्हणजे शिवधनुष्य🏹 ऊचलण्याजोगं आहे..... *
*ही किमया 90 च्या दशकात राजकीय वारसा असलेला नव्हे तर सर्वसामान्य घरातील तरुणाने करून दाखवली..... 👨🏻*
काही पदं अशी असतात की त्या पदावर असेपर्यंत त्या व्यक्तीची ओळख असते... पण काही संघर्षयोध्दे आपल्या कार्याने त्या पदाला ईतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात की , समाजच त्या व्यक्तीला ते पद कायमस्वरूपी बहाल करतो....
*नाव - संजय दिगंबर बालगुडे ऊर्फ अध्यक्ष*
*अध्यक्षांच्या पदांची आणि कामाची ओळख जर करून द्यायची म्हणली तर कमीत कमी 300 पानाचं पुस्तक 📓तर नक्कीच लिहायला लागेल.....*
अध्यक्षांचं शालेय शिक्षण खेळासाठी आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र मंडळ येथे झाले...... त्यानंतर माॅडन महाविद्यालयात असताना राजकारणात प्रवेश केला. *वयाच्या 23-24व्या वर्षी च आपल्या पुण्यनगरी च्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थ पणे विक्रमी 16 वर्षे सांभाळली.....*
पुणे शहराचं हृदय समजले. जाणाऱ्या स्वारगेट जवळ असणाऱ्या खडक माळ आळीत त्यांचे वास्तव्य...🏠 प्रसिद्ध अभिनेते निळु फुले हे त्यांचे शेजारी ...
युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना 16 वर्षात देशपातळीवर आणि राज्यात काॅंग्रेस, शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना पुणे महानगरपालिकेवर सतत काॅंग्रेस चा झेंडा✌🏻 फडकवत ठेवण्यामागे सर्वात मोठा हात हा अध्यक्षांचा होता.1985 साली अगदी कमी वयात महापालिकेच्या निवडणूकीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला....पण शांत बसेल तो जंगलाचा राजा कसला...आपले सामाजिक कार्य त्यांनी अजुन जिद्दीने सुरू ठेवले.1997 साली तर विक्रमी मतांनी निवडून येउन त्यांनी महापालिकेत दणक्यात एंट्री घेतली🚶🏻♂️..... नुसती एंट्री नव्हती तर अभ्यासु 📖राजकारणी व्यक्तीमत्व काय असतं याची ओळखच करून दिली. अनेक भष्टाचार💰, घोटाळे 💵तर बाहेर काढलेच *पण राज्यातील एका सर्वात मुख्यमंत्री असणाऱ्या मनोहर जोशी यांना सुध्दा गिरीश व्यास प्रकरणात राजीनामा📄 द्यावयास लागला पाडले....युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना एक नव्हे तर दोन वेळा खुद्द पंतप्रधान राजीव गांधी साहेब आणि पी. नरसिंहराव साहेब त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते..... शेकडो मुलांना पीएमटी आणि महापालिकेमध्ये भरती 1 रुपया ही न घेता केली...अध्यक्ष पुणे शहर युवक काँग्रेस १६ वर्ष ,PMT अध्यक्ष, 🚌*
नगरसेवक पुणे मनपा, सचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसमहाराष्ट्र प्रदेश कांग्रेस संघटनेच्या माध्यमातून विविध तालुका, शहर नगरपालिका येथे निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली.
*राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रामकृष्ण मोरे हे अध्यक्षांचे प्रेरणास्थान....👏🏻*
खडक सार्वजनिक गणेशोत्सवाच मंडळाचे ते अध्यक्ष.....एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक असा प्रवास करणारे अध्यक्ष हे पुणे शहरातील पहिलेच उदाहरण असेल....गणेशोत्सवात असा एक पण भक्त नसेल जो या मंडळाचे डेकोरेशन पाहिल्याशिवाय🎊🪅 घरी जात असेल... यातच मंडळाच्या देखाव्यांची भव्यता दिसुन येते.... याचे संपूर्ण श्रेय अध्यक्ष स्वत नेहमी सर्व कार्यकरत्यांना देतात....
समाजसेवा करत असताना त्यांना अनेक विविध पुरस्कार मिळाले🥇🏅🎖️ पण महाराष्ट्र शासनाकडुन रक्तदानाविषयीचा🩸 विशेष कार्याचा पुरस्कार🏆 त्यांना सन्मानित करण्यात आले.... क्रिकेट,🏏 सायकलिंग🚴🏻♂️, पोहणे ,🏊🏻♂️शरीरसौष्ठव 💪🏻हे त्यांचे आवडते क्रिडाप्रकार .... आज पण वयाची 50 ओलांडल्यानंतर सुध्दा कोणी तरुण अथवा लहान मुले क्रिकेट खेळताना दिसल्यास त्यांना क्रिकेट 🏏खेळण्याचा मोह ते टाळू शकत नाही....दरवर्षी ते क्रिडा प्रकार 🚴🏻♂️💪🏻🏏आणि कला🎭🎨🎬🎤 स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित करतात....
आयुष्यामधील 40 वर्षापेक्षा जास्त केवळ एकाच पक्षाशी एकनिष्ठ राहुन केलेले काम आणि सेवा ही खरीच वाखण्याजोगी आहे. कुठल्याही कामाची जाहीरात 📄न करता कामाचे सातत्य ही त्यांच्या कामाची ओळख...... कार्यकर्त्यांच्या मनातील गोष्ट ओळखणारा नेता म्हणजे अध्यक्ष संजय दादा बालगुडे.... 👑
असे हे पुण्यनगरी साठी झटणारे दमदार अभ्यासु नेतृत्व भविष्यकाळात महाराष्ट्रातील विधानमंडळात दिसणार यात तिळमात्र शंका नाही.... आणि तेवढ्याच ताकदीने अष्टपैलू असलेले हे व्यक्तिमत्त्व विधिमंडळ सभागृहात आपल्या भाषणाने आणि वक्तृत्वाने दणाणून सोडावे हीच सर्व कट्टर पुणेकरांची मनस्वी ईच्छा आहे.
आज अध्यक्षांचा वाढदिवस....त्यानिमित्ताने आपणास #शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची #भव्यता, पुरंदरची #दिव्यता, सिंहगडाची #शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!🚩 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! या सदिच्छा...🌸👍🏻
लेखाची संकल्पना
उद्योजक गिरीशदादा बालगुडे
माहीती संकलन
युवा नेतृत्व ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे
Written By
Adv. Girish M. Bhosale
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा