सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो - भाग 5, अक्षयदादा कोठावळे

पुण्याचे सुपरहिरो - भाग 4


सुपरहिरो....... कोण असतो हा सुपर हिरो.....? 100 जणांना एका फाईटित लोळावणारा असतो का सुपरहिरो.... हिरोईन ला वाचविणारा असतो का सुपरहिरो?..... हे सगळं चित्रपटात चांगलं वाटतं.... प्रत्यक्षात नाही.... पण या महामारी च्या काळात काही सर्व सामान्य घरातील युवक , युवती , जनसेवक लोकांच्या मदतीला धावून आले.....हेच ते खरे सुपरहिरो..... असाच एक सुपरहिरो जो अगदी सर्वसामान्य , तुमच्या आमच्यातला... पण त्याचे कार्य आभाळापेक्षा मोठं असु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अक्षयदादा कोठावळे...... 


कोण आहे अक्षय कोठावळे.... कोण नगरसेवक आहे?.... उद्योजक आहे?....नेता आहे..... अजिबात नाही.... अक्षय कोठावळे ही व्यक्ती एक सर्वसाधारण रिक्षाचालक, पण त्यांना आलेल्या अडचणी आणि या अडचणींवर मात करुन आपले कार्य न थांबता चालू ठेवणारे नाव म्हणजे अक्षयदादा कोठावळे.....

स्वताच लग्न मे महिन्यात ठरले होते. कष्ट करुन लग्नासाठी 2 लाख जमवले होते. लाॅकडाऊन मध्ये गरिब आणि गरजु लोकांचे हाल पहावले नाही आणि कष्ट करून जमवलेली 2 लाख रुपयांची रक्कम त्यांनी समाजकार्यासाठी वापरायची ठरवली. दररोज साधारणपणे 400 लोकांना स्वखर्चाने अन्नदान करण्याचा उपक्रम या सुपरहिरोने सुरू केला. यामध्ये त्यांच्या होणाऱ्या पत्नी ने आणि कुुटुंबीयांनी सुध्दा मोलाची साथ दिली. ही मदत करत असताना अक्षय यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. पण दु:ख बाजुला ठेवून हा योध्दा कार्यरत राहिला. अक्षय यांच्या वडील आजारी असताना त्यांचा वडिलांना ये-जा करण्यासाठी अँब्युलन्स मिळाली नव्हती. असं इतरांसोबत होऊ नये म्हणून अक्षय यांनी रिक्षाद्वारे मोफत अँब्युलन्स सेवा सुरू केली आहे. जमिनी वर पाय असलेला सर्व सामान्य घरातील सुपरहिरो चे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अक्षय कोठावळे. 

प्रचंड ईच्छाशक्ती च्या जोरावर माणुस काहीही करु शकतो याचा प्रत्यय म्हणजे अक्षय दादा कोठावळे. 
आपल्या या अभुतपूर्व कार्याला समस्त पुणेकरांच्या वतीने सलाम..... सलाम..... सलाम...... 


तु दिलेर भी है...... ❤️
और दर्यादिल भी...... 🌊❤️
आपका नाम सबसे ऊपर होगा...... 


लेखक
अॅड गिरीश भोसले

टिप्पणी - योगायोगने अक्षय दादा कोठावळे आणि मी एकाच शाळेचे विद्यार्थी आहोत. ( कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाला, महाराष्ट्र मंडळ) अक्षय दादा हे मला शाळेत वरीष्ठ असुन माझा आणि त्यांचा कुठलाही परीचय नाही. 
सदर लेख हा त्यांचा समाज उपयोगी कार्याच्या प्रित्यर्थ लिहलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...