बाप्पा.....
प्रति,
गणपती बाप्पा,
पत्ता- मातीच्या एका
कणापासुन ते आकाशातील
पावसाच्या एका थेंबा
पर्यंत सर्वव्यापी.....
नको ना जाऊ तु बाप्पा.... 10 दिवस गणपती चा मंडप च आमच्यासाठी घर झाले होते. आणि आज विसर्जनानंतर सगळा मांडव सुना सुना होईल. करोना महामारी च संकट असलं तरी आम्ही तुझ्या मांडवात निर्धास्त होतो. कारण आमचा विघ्नहर्ता सोबत असताना आम्हाला कशाची ही भिती नव्हती.
आजपासून घर आणि मांडव सुना सुना होणार..... लहान लेकराचे रडणे पाहुन मन पण भरून येतय. ....या वर्षी करोना च्या महामारीमुळे ऊत्सवावर जरी निर्बंध आले असले तरी आमचा कार्यकर्त्यांचा ऊत्साह तसभुरही कमी झाला नाही.
तु जरी गावला जात असला.... तरी तुच पृथ्वीच्या कणाकणात आहे......
आमच्या मनात तु आहे....
आमच्या ध्यानात तु आहे....
विचारात तु आहे.....
आचरणात तु आहे.....
पोलिस , डाॅक्टर, हाॅस्पिटल कर्मचारी, सफाई कामगार आणि करोना योध्दा बांधवाच्या रुपात तु तुझा अंश मनुष्य रुपात देऊन जात आहे. पण पुढच्या वर्षी तु जेव्हा येशील त्या वेळी आतापर्यंत न झालेला असा भव्य दिव्य, डोळे दिपवणारा महाऊत्सव आम्ही साजरा करू.
निरोप घेतो आता तुझा
आम्हा आज्ञा असावी
चुकले काही आमुचे
"आम्हा क्षमा असावी"
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
कळावे.
प्रेषक
तुझाच लाडका भक्त
संकल्पना आणि लेखन
गिरीश भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा