वैभवदादा वाघ - जात धर्म कर्म भारतीय या संकल्पनेचे शिल्पकार
काही जण आपल्या कार्याने सुपरहिरो होतात किंवा आपल्या कामाच्या शैलीमुळे सुपरहिरो असतात. पण काही व्यक्ती जन्मतःच सुपरहिरो असतात..... असाच एक आपल्या पुणे शहरातील जनसेवेचा वारसा जन्मतः वारसा घेऊन जन्मलेला सुपरहिरो म्हणजे वैभवदादा वाघ......
फक्त करोना च्या काळात नव्हे तर 12 महिने 24 तास अनोळखी व्यक्ती ने जरी मदतीसाठी हाक मारली तरी पहिली हजर असणारी व्यक्ती म्हणजे वैभवदादा.
आपल्या वंदेमातरम संघटना, आणि युवा वाद्य पथक आणि आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने करोना प्रादुर्भावात केलेले काम म्हणजे कौतुक करण्याजोगे.
4 लाख पेक्षा अधिक फुडपॅकेट्स चे वाटप, तसेच 15 हजार पेक्षा जास्त गरजुं कुटुंबांना अन्नधान्य किट्स वाटप, 20 हजार पेक्षा जास्त अरसेनिक गोळ्यांचे वाटप, आणि कोकणात मोठ्या प्रमाणात सौर दिव्यांचे वाटप, या सुपरहिरो आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले. रायगड जिल्ह्यात ज्या वेळी वादळाने थैमान घातले होते त्यानंतर खुद्द स्वताहा भर पावसाळ्यात कोकणातील व्यक्तींना मदत करणारा हा संघर्ष योध्दा. वयोवृद्ध अथवा गरजु व्यक्तीना औषधे पोहचविणारा , गरजु उमेदवारांना नोकरी मिळवुन देण्यासाठी धडपड करणारा , कोणतेही काम करायला न लाजणारा हा तरुण म्हणजे युवकांसाठी एक आयडाॅल च म्हणावा लागेल. पुणे शहरात प्लाझ्मा डोनेशन चे शतक करणारी वंदेमातरम संघटना ही पहिलीच असेल. या काळात सचिन आण्णा जामगे, अॅड अनिष व अॅड मनिष पाडेकर सर व सेवा मित्र मंडळ आणि वंदे मातरम संघटनेच्या आणि शेकडो मित्रांच्या मदतीने अन्नदानाचा, समाजसेवेचा आणि प्लाझ्मा डोनेशन चा रेकार्ड करणारा पुण्यातील पहिला मित्र परीवार असेल.
काही लोकांचे कार्य सांगायला गेले तर शब्द संपतील पण त्यांच्या कार्याचा अहवाल संपणार नाही...... याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैभवदादा वाघ.....
फक्त करोना च्या काळातील नव्हे तर त्यांचे न संपणारे उपक्रम पाहण्यासाठी भारत देशावर प्रेम करणा-या प्रत्येक नागरिकाने त्यांचे फेसबुक अकाऊंट ला एकदा भेट द्या.
एक सामान्य घरातील एक देशसेवेला🇮🇳 आणि समाजसेवेला आपले आयुष्य वाहुन घेतलेला तरुण👨🏻 काय असतो याची प्रचिती आपल्याला येईल.
काही दिवसांपूर्वी त्यांची फेसबुक वरची एक पोस्ट पाहिल्यावर लक्षात आले की वैभवदादा हे करोना पाॅझिटिव आहेत. पण ज्याच्या नावातच वाघ 🐯आहे त्याच्या समोर करोना म्हणजे किस झाड की पत्ती.☘️
दादा लवकर करोना चारिमुंढ्या चित करून आपल्या नवीन संकल्पनेची आणि नवीन उपक्रमांची आम्ही आवर्जून वाट पाहतोय.
"जात, धर्म आणि कर्म केवळ भारतीय 🇮🇳" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो प्रत्यक्ष इतर राबवणारे वैभवदादा वाघ आपणास समस्त पुणेकर बांधवांकडुन आपल्या अगणित समाज ऊपयोगी कार्याला सलाम...... सलाम...... सलाम...... 🙏🏻
लेखक🖋️
आपल्या नवनवीन संकल्पनेचा आणि जनसेवेचा चाहता
अॅड. गिरीश भोसले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा