शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो - भाग 3, ऋषिकेश बालगुडे आणि त्यांची अवेंर्जस टिम

पुण्याचे सुपरहिरो - भाग 3

'मदत नव्हे तर कर्तव्य' चे जनक

अवेंजर्स .... आतापर्यंतचा  सगळ्यात यशस्वी चित्रपट. सुपरहिरो ची टिमच थॅनोस राक्षसाचा नाश करते. ज्या पुणे शहरात करोना रुपी थॅनोस राक्षस अवतरला त्या वेळी एक सुपरहिरोची अवेंजर्स टिम या राक्षसापासुन आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत करीत होती. आणि या सुपरहिरो टिमचे कॅप्टन होते "ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे."

मौत को देखा पैरों🦶🏻 की धुल की तरह, 
तकदीर को ठुकराने वाले सुल्तान 💪🏻की तरह, 
चिंगारी🔥 पैर से दबाके धरधर खंजर🗡️ पे चलके, दिल❤️ में जो डर ऊठा ऊसे हमेशा के लिए मारके,
जिगरवालों योध्दा की फौज⚔️🛡️ बनाकर दुष्मन पे छा गया. 
काल का विनाश करने महाकाल आहे गया....... 🤩

हे वाक्य ज्या व्यक्तीला तंतोतंत लागू पडते ते अष्टपैलू जनसेवकाचे उत्तम उदाहरण म्हणजे ऋषिकेश  पांडुरंग बालगुडे.

समाजातील सगळ्याच घटकातील आणि सर्वच क्षेत्रातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम ऋषिकेश बालगुडे  आणि त्यांच्या अवेंजर टिमने यशस्वीरीत्या राबवून दाखवले. 'मदत नव्हे तर कर्तव्य" या भावनेमधुन केलेले काम हे प्रत्येक पुणेकरांसाठी एक आदर्शच म्हणावा लागेल. 

करोना च्या काळात ज्या वेळी भले भले महारथी घरात बसले होते त्या वेळी या अवेंजर्स टिमने गरजू लोकांना घरोघरी जाऊन अन्नधान्य, दुध,घरातील दररोज च्या वापरातील वस्तूंचे  वाटप केले.यामध्ये कुठलाही भेदभाव न करता गरजु रिक्षाचालक, वाहनचालक, कलाकार ,पडद्यामागचे कलाकार,हातावर पोट असणारे मजुर अशा सर्वांना मदत करण्यात आली. लाॅकडाऊन च्या पहिल्या दिवसापासून जवळपास ६००-७०० गरजु लोकांना तसेच पुणे शहरातील Mpsc/Upsc करणा-या विद्यार्थी मित्रांची सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली...... पोलीस आणि ईतर कर्मचारी बांधव यांना त्यांच्या स्वरक्षणासाठी हजारो फेसशिल्डचे आणि मास्कचे वाटप तसेच मार्च ते मे महिन्यात दररोज 400-500 पाणी बाॅटल्स आणि कोल्ड्रिंक्स वाटप करण्यात आले...... पुणे जिल्हा सत्र न्यायालय आणि पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात तसेच सरकारी कार्यालयात तापमान मोजण्यासाठी टेम्प्रेचर गन 🔫आणि आॅक्सिमिटर 🌡️चे वाटप करण्यात आले.  शहरात रक्ताचा तुटवडा पडला असताना रक्तदान शिबिराचे तसेच प्लाझ्मा डोनेशन चे आयोजन, पेट्रोल पंपावरील कर्मचारी वर्गाला तसेच ईतर कामगारांना मोठ्या प्रमाणात मास्क आणि फेसशिल्डमास्क वाटप, शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांना आणि कर्मचारी वर्गाला सॅनिटाइजर आणि सॅनिटाइजर स्टॅण्ड चे वाटप ऋषीकेश बालगुडे आणि मित्र परिवारातर्फे करण्यात आले. गणेशोत्सव काळात सरकारने दिलेल्या नियमानुसारच गणपती विसर्जनासाठी हौद ऊपलब्ध करून देण्यात आले, तसेच शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन , रहीवासी ईमारती आणि ईतर महत्त्वाचे ठिकाणी फवारणी करून जंतुसंसर्ग टाळण्यासाठी विशेष योजना  या योध्यांनी स्वतः काम करुन प्रत्यक्षात आणल्या. 

या महामारी च्या काळात सर्वात महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे जनजागृती आणि मार्गदर्शन सुचना. करोनाग्रस्त रुग्णांना योग्य ते माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी काॅलसेंटर ची उभारणी, तसेच हाॅस्पिटल मधुन डिस्चार्ज मिळाले नंतर घ्यावयाची काळजी या सुचनांचे नियोजन, करोनाग्रस्तांना लवकरात लवकर बेड आणि ट्रीटमेंट उपलब्ध होण्यासाठी  ऋषीकेश बालगुडे यांनी केलेली धडपड आणि प्रयत्न वाखण्याजोगी आहे. करोना जम्बो कोविड सेंटर मध्ये प्रशासन आणि नियोजकांकडुन झालेल्या चुका दाखवण्याचे आणि योग्य ते ऊपाय सुचवण्याचे काम करणे, तसेच लाॅकडाऊन च्या काळात जे नागरिक महाराष्ट्राबाहेर अडकले होते त्यांना परत सुखरूप पुण्यात आणण्यासाठी त्यांच्या सतत संपर्कात राहून आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देणारा योध्दा म्हणजे ऋषिकेश बालगुडे. गिरीश बालगुडे हे त्यांचे लहान बंधु.... ते सुद्धा या लढाईत तेवढ्यात ताकदीने या महामारी लढाईत उतरून थोरल्या भावाला साथ दिली..... अजय अतुल ची जोडी तर पुणेकरांनी पाहिली.... पण या सुपरहिरो भावांची जोडीचे हे कदाचित पहिलेच उदाहरण असेल. 

करोनाग्रस्त रुग्णांना बेड मिळवुन देण्यासाठी केलेली धडपड आणि त्यानंतर त्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मानलेले आभार हीच कामाची पावती माणुन हा करोनायोध्दा आजसुद्धा पुणेकरांना मार्गदर्शन आणि मदत करण्यास कुठे ही कमी पडत नाही. 'मदत नाही तर कर्तव्य' या ब्रिदवाक्याचा प्रात्यक्षिकच संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. 

आपल्या  स्वताच्या कुटुंबावर सुध्दा करोना ने हल्ला केला असताना हा योध्दा माणुसकीची लढाई तेवढ्याच ताकदीने आणि त्वेषाने लढत होता आणि आजही लढतोय.

खासदार श्रीरंग अप्पा बारणे, संजयदादा बालगुडे, पुनितदादा बालन, राहुलदादा कुल , बाळासाहेब दाभेकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन आणि कुटुंबातील भा गिरीश बालगुडे, विनित बालगुडे आणि अभिषेक बालगुडे भावांची आणि सदस्यांची खंबीर साथ तर होतीच पण  सोबत बाळासाहेब पिलावरे, शैलेश परदेशी,उमेश काशीद ,अमर देसाई, ऋषिकेश गायकवाड, युवराज देसाई, राकेश गुंजाळ, चैत्यन राऊत ,प्रणव नामेकार, सुरज गायकवाड, विकास गायकवाड , योगेश पारडे, मिलिंद रसाळ,हेरंब पिलावरे ,स्वप्निल पायगुडे, अनिकेत रूपनर, अभिजीत नलगे, आशिष परदेशी, अभिजित राऊत,  तुषार चौधरी, राहुल काळे, वैभव बालगुडे,  भगवान चौधरी, साई होले,श्री होले,आकाश पायगुडे, प्रतीक शेलार, दिव्येश कदम, गणेश पडळकर, समर्थ पिलावरे, अथर्व पाथरे,अथर्व शेडगे, प्रसाद होले, आणि खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आणि राजीव युवा फाऊंडेशन चे लहान थोर कार्यकर्ते ही एक भली मोठी अवेंर्जस टिम पण तहान भुक हरवुन न घाबरता मदत नव्हे तर कर्तव्य हे ध्येय ऊराशी बाळगुन काम करत होती, "आणि या सर्व अवेंर्जस च्या टिमला एकत्र आणणारा आर्यन मॅन  म्हणजे ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे."


अशा या सुपरहिरो ला आणि त्यांच्या अवेंर्जस टिम आणि मार्गदर्शकांना आणि त्यांच्या कार्याला पुणेकरांच्या वतीने सलाम..... सलाम...... सलाम🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...