शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

भाग 3 - आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007 युवराज सिंग च्या 6 षटकाराची गोष्ट

भाग 3 - आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007 

दिनांक 19 सप्टेंबर 2007
डरबन साऊथ आफ्रिका

सुपर 8 च्या सुरुवातीला न्यूझीलंड संघाकडून पराभव झाल्यानंतर आजच्या दिवशीचा ईंग्लंड संघाविरुद्धचा सामना जिंकणे भारतीय संघाला अनिवार्य होते. हा सामना भारतीय संघाने जिंकला पण हा सामना युवराज सिंग च्या एका ओवरमधल्या 6 षटकारामूळे जास्त चर्चेत राहिला. आणि येथुनच युवराज ला सिक्सर्स किंग पदवी प्रेक्षकांनी अर्पण केली. 

टाॅस जिंकल्यावर भारतीय संघाने फलंदाजी चा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत सेहवाग आणि गंभीर ने अर्धशतके झळकवित  136 धावांची सलामीची भागिदारी रचली. दोघे बाद झाल्यानंतर 15 व्या षटकानंतर युवराज ची मैदानावर एंट्री झाली. 2-4 चेंडू खेळुन झाल्यानंतर ईंग्लंड च्या अॅण्ड्रु फ्लिंटाॅफ  ने युवराज ला शेरेबाजी केली. मग शांत बसेल तो युवराज कसला... युवराज आणि फ्लिंटाॅफ मध्ये जोरदार शाब्दिक चममक झाली. आणि इथेच फ्लिंटाॅफ कडून सर्वात मोठी चुक झाली . त्याच्या या शाब्दिक शेरेबाजी मुळे चिडलेल्या युवराज सिंग ने 19 व्या षटकात स्टुअर्ट ब्राॅड  ला सलग 6 षटकार ठोकले.  षटकार ईतके जबरदस्त होते की ईंग्लंड च्या सर्व खेळाडूंनी तोंडात बोटे घातली कर्णधारासकट. 6 वा षटकार मारले नंतर स्टेडियम मध्ये विश्वचषक जिंकल्यासारखा जल्लोष झाला. पुढच्या षटकात युवराज ने फ्लिंटाॅफ ला सुध्दा एका कडक षटकारांची महाप्रसाद दिला. 20 षटकांत भारतीय संघाने 218 धावांचा डोंगर उभा केला. 

या महाकाय आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न ईंग्लंडने केला पण त्यांचे प्रयत्न जिद्दी भारतीय संघाने पुर्ण होऊ दिले नाही. भारतीय संघ 18 धावाने सामना जिंकला . 

 एकाच षटकात 6 षटकार मारणा-या युवराज सिंग ला  सामना विराचा किताब देण्यात आला. आणि विश्वचषकाच्या दिशेने भारतीय संघाने अजुन एक दिमाखदार पाऊल टाकले

युवराज सिंग ने मारलेल्या 6 षटकार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
https://youtu.be/9wJAq_Dg5FA

माहिती संकलन आणि लेखन
अॅड. गिरीश भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...