विजयाची ती 13 वर्षे......
भारतीय संघ 2007 च्या विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीतुन बाहेर पडला .... खुप टिका झाली.... टि 20 चषकासाठी महेंद्र सिंग धोनी ला कर्णधार म्हणून नेमण्यात आले. सचिन द्रविड गांगुली या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतली होती आणि धोनी च्या नेतृत्वाखाली नवखा संघ टि 20 चा पहिला विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेला पाठविण्यात आला.
पहिलाच सामना पावसामुळे रद्द. दुसऱ्या सामना पाकिस्तान विरुद्ध. ते सामना अनिर्णित राहिल्यावर बाल आऊट ने सामन्याचा निर्णय घेण्यात आला. आणि सामना भारतीय संघ जिंकला.
हेच दोन्ही संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले. दिवस होता 24 सप्टेंबर 2007 स्थळ होतं जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका....भारतामध्ये साधारणपणे सायंकाळचे 6-7 वाजले होते.
सामन्याला सुरवात झाली. ठराविक अंतराने भारतीय संघाच्या विकेट पडत होत्या पण गौतम गंभीरने एका बाजूने किल्ला लढवुन ठेवला होता. गंभीर च्या 75 आणि रोहित शर्मा च्या 30 धावांमुळे भारतीय संघाने पाकिस्तान संघासमोर 158 धावांचे आव्हान ठेवले.
सहज वाटणारे आव्हानाला सामोरे जाताना सुध्दा पाकिस्तान चा संघाने विकेट फेकल्या पण मिसबाह ऊल हक हा खेळाडू मैदानावर असल्याने भारतीय संघासाठी धोकादायक ईशारा होता. आणि झाले ही तसेच, शेवटच्या षटका पर्यंत सामना रंगला. शेवटचे षटक धोनी ने नवख्या जोगिंदर शर्मा ला दिले. एक वाईड आणि एक षटकार गेल्यामुळे सामना भारतीय संघाच्या हातून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटचा षटकाच्या तिस-या चेंडुवर मिसबाह ऊल हक चेंडू मागे टोलवायला गेला.... टायमिंग चुकले..... चेंडू हवेत ऊडाला.... एका क्षणासाठी भारतीयांच्या हृदय धडधडायचं थांबलं.... आणि श्रीसंत ने अलगद कॅच पकडला.......
आणि त्यानंतर होता केवळ जल्लोष...... जल्लोष...... आणि फक्त जल्लोष..... टि 20 चा पहिला वहिला विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. आणि भारतात म्हणताल तर दोन महिने अगोदर च दिवाळी साजरी झाली होती.
काही दिवसांपूर्वी ज्या संघाला पहिल्या फेरीतुन बाहेर पडायला लागले होते त्याच आपल्या भारतीय संघाने ईतिहास घडविला होता. अनंत चतुर्दशी चा आदला दिवस होता.... गणपती बाप्पा ने जणु भारतीयां साठी जाता जाता गिफ्ट च दिले होते. दोन दिवसानंतर भारतीय संघ ज्या वेळी मुंबईत परतला त्या वेळी ओपन बसमधून काढलेली मिरवणूक आणि भारतीय संघाचा वानखेडे मैदानावर झालेला सत्कार हा डोळे दिपवणारा होता........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा