गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो भाग - ६, निलेश दादा पिंगळे आणि मित्र परिवार

मैं ऊडना चाहता हुं, ...... 
दौडना चाहता हुं, ....... 
गिरना भी चाहता हुं...... 
बस रुकना नहीं चाहता..... 

असेच काही व्यक्ती असतात. कितीही मोठं संकट येऊ द्या. त्या संकटाचा कर्दनकाळ बनुन आपले काम अविरतपणे चालू ठेवतात. अशा योध्द्यांनाच सुपरहिरो म्हणतात. 
अशाच एका पुणे शहराचा एक भाग असलेला पिंपरी चिंचवड मधील एका सुपरहिरो बद्दल आज आपण माहिती घेऊया. 
नाव - निलेश जनार्दन पिंगळे
सदस्य थेरगाव सोशल फाऊंडेशन

निलेश पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाॅकडाऊन च्या सुरुवातीच्या काळात शेकडो नागरीक आणि विद्यार्थी ज्यांना मेस आणि हाॅटेल बंद असल्याने जेवणाचा प्रश्न उभा राहिला होता त्यांच्या साठी सुरवातीला स्वखर्चाने दररोज 40 डब्यांची व्यवस्था केली. या सेवेत त्यांना त्यांचे मित्र अनिकेत प्रभु, राहुल सरोदे, अमित घोडेकर याची महत्वपूर्ण साथ लाभली. आणि पाहता पाहता अन्नदानाचे कार्य 40 डब्यांवरुन हजारोंच्या घरात पोहचले. या कार्यात त्यांना त्यांच्या बरोबर त्यांचे जवळपास 200 सहकारी योध्द्यांची फौज मदतीला होती. या अन्नदानाचा मदतीसाठी सोशल मिडियाचा योग्य वापर या सुपरहिरोंनी केला. नागरीक आणि गृहनिर्माण संस्था नी सुध्दा या कामात त्यांना मदत केली. जेवणासाठी लागणारी भाजीपाला काढण्यापासून ते भांडी धुणे ही कामे त्यांनी स्वखुशीने न लाजता केली. 
जवळपास ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा 1000 पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांनी अन्नधान्य किट्स चे वाटप केले. मिनी माथेरान समजले जाणारे खालापूर तालुक्यातील ऊंबरवीरा गावाला जेव्हा निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला त्या वेळी तेथील नागरीकांना अन्नधान्य, चट ई, ब्लॅंकेट, चादर आणि गरजेचे साहित्याचे स्वखर्चाने वाटप करुन एक साद माणुसकीची हा यशस्वी उपक्रम राबविला. केवळ 11 दिवसात प्लाझा डोनेशन चे शतक पुर्ण करणारे थेरगाव सोशल फाऊंडेशन हे पुणे जिल्ह्यातील पहिलीच सेवा भावी फाऊंडेशन असेल. फाऊंडेशन कडुन आतापर्यंत 350 पेक्षा जास्त जणांचे प्लाझ्मा दान पुर्ण करण्यात आले आहे. तसेच रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्यात आले. 
आणि या संपुर्ण सेवाभावी कार्याचे शिल्पकार म्हणजे निलेशदादा पिंगळे आणि त्यांची वाॅरीयर टिम.

किनारे बैठकर पानी में काँटा डाले मछली के फंसने का इंतजार करने वाले को बहादुर नहीं कहते..
सच्चा बहादुर वो होता है, 
 जो तूफानी समुन्दर के बीच में जाकर मछली पकड़ने का जाल फेंकता है.

करोना ला न घाबरता , संकटाला सामोरे जाऊन स्वत समाजसेवेच्या मैदानावर उतरून मदतीचा पाऊस पाडणारा निलेश दादा पिंगळे आणि त्यांचे सहकारी वाॅरीयर टिम आपल्या कार्याला पुणेकरांचा मानाचा मुजरा. 

विशेष सहकार्य - ऋषिकेश ऊर्फ आबा बालगुडे

लेखक
अॅड गिरीश भोसले
निलेश दादा पिंगळे आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन चा सदस्यांचा आणि माझा कुठल्याही प्रकारे हितसंबंध अथवा परिचय नसुन सदर लेख हा निलेश दादा पिंगळे आणि त्यांचे शेकडो सहकारी यांच्या अभुतपूर्व कार्या प्रित्यर्थ लिहलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...