पुण्याचे सुपरहिरो, भाग 7, निरंजन भाऊ आणि बाळासाहेब उर्फ आण्णा दाभेकर.
भावाभावांची सुपरहिट जोडी असते..... मित्रांची सुध्दा असते...पण वडिल आणि मुलाची जनसेवक रुपी सुपरहिरो ची जोडी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात नागरीकांना पहायला मिळाली..... बाळासाहेब ऊर्फ अण्णा दाभेकर आणि त्यांचे चिरंजीव निरंजन दाभेकर, राहणार. नारायण पेठ
जिंदगी जीने के दो तरीके होते है.
एक-जो हो रहा है होने दो, बरदाश्त करते जाओ,
या फिर जिम्मेदारी उठाओ, ऊसे बदलने की,
या महामारी च्या काळात पुणे शहरात नारायण, सदाशिव पेठ आणि सभोवतालच्या भागात गरजु लोकांसमोर पोट भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी त्यांच्या साठी स्वखर्चाने १०१ दिवस अन्नदान करण्याचे शिवधनुष्य उचलले ते या सुपरहिरो पिता पुत्राच्या जोडीने. एकही दिवस खडा न करता सलग 101 दिवस शेकडो लोकांना अन्नदान करण्याचे एक सुंदर समाज उपयोगी काम निरंजन दाभेकर यांनी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शनाखाली केले. शेकडो नागरीक ज्या मध्ये बॅकस्टेज काम करणारे कलाकार, गरजुंना दररोज औषधे, अन्नधान्य, फळे, कपडे, चप्पल, पाणी, सॅनिटाइजर, वाटप केले. तसेच आरोग्य आणि रक्त दान शिबिरांचे आयोजन केले. आणि या मध्ये त्यांना मदत झाली शेकडो मित्र परिवार आणि स्वयंसेवी नागरिकांची.
करोना कोणाच्याही घरी येऊ शकतो त्यामुळे कोणत्याही करोना बाधीत कुटुंबातील लोकांशी भेदभाव करू नका..वेळ कोणा साठी थांबत नाही कधीही येते काळजी घ्या ..आम्ही तुमच्या सोबत आहे.
हा संदेश निरंतरपणे नागरिकांना देउन लोकांना विश्वासात घेऊन काम करणारे संघर्ष योध्दा पिता पुत्राची जोडी म्हणजे निरंजनभाऊ आणि बाळासाहेब ऊर्फ अण्णा दाभेकर .
अगर आपके ईरादे मजबूत है तो, बडे से बडा तुफान भी आपका कुछ नहीं बिगाड सकता ...... या वाक्याची प्रचितीच जणु या करोना वाॅरीयर पिता पुत्रांनी करून दिली. या महामारी च्या काळात सर्व सामान्य नागरिकांना मदतीचा मजबुत हात देणारे पिता पुत्रांच्या कार्याला सलाम.. सलाम.... सलाम
Nice Blogs...
उत्तर द्याहटवा