रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

ओ.....डॅम-ईट....ईनस्पेक्टर महेश..... श्रीरंगपुर.... लक्ष्या

महेश..... महेश...... महेश...... 

ईनस्पेक्टर महेश.....80,90दी मध्ये जन्मलेल्या सर्वांचा आवडता डॅशिंग मराठी हिरो म्हणजे महेश कोठारे. आम्हां 90दी मध्ये जन्म घेतलेल्यांसाठी महेश कोठारे हे आमच्या साठी सुपरहिरोच होते. लहानपणापासूनच शनिवारी आणि रविवारी 4 वाजता त्यांचे चित्रपट कधी लागणार याची  आठवडा भर वाट पहायचो आम्ही.

तात्या विंचू,टकलु हैवान, कवट्या महाकाळ, कुबड्या खविस, बाबा लगिन वाला बाब्या, बाबा चमत्कार, मृत्यूंजय मंत्र, आणि सर्वात महत्त्वाचे नवकोटनारायण यदुनाथ जवळकर या पात्रांना जन्माला घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले श्रीरंगपुर चे महेश कोठारे. 
बालकलाकार असलेले महेश कोठारे यांनी 1964 मध्ये छोटा जवान  चित्रपटातुन पहिल्यांदा आपल्या अभिनयाची जादु दाखविली. आणि त्यानंतर आज 55 वर्षा नंतर सुध्दा हा महाराष्ट्राचा आवडता कलाकार लोकांना आपल्या घरातील वाटतो. 

अभिनेता,लेखक, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या महेश कोठारे यांनी आपल्या नवनवीन कल्पनाशक्तीद्वारे मराठी माणसाला चित्रपटगृहात वारंवार येण्यास आवडीने भाग पाडले.  झपाटलेला मधला तात्या विंचू असो किंवा धुमधडाका मधले यदुनाथ जवळकर असो, महेश जींनी जन्माला घातलेली पात्र ही चित्रपट सृष्टीत अजरामर करुन टाकली. ईनस्पेक्टर महेश आणि धांदरट लक्ष्या म्हणजे आपले लक्ष्मीकांत बेर्डे ऊर्फ मामा यांची जोडी तर तुफान लोकप्रिय झाली.

धुमधडाका, झपाटलेला, थरथराट, धडाकेबाज, पछाडलेला, झपाटलेला, माझा छकुला, जबरदस्त, खबरदार, दे दणा दण, धांगडधिंगा यांनी थिएटर च्या बाहेर आणि आत अक्षरक्षः धुमाकूळ घातला.आणि सध्या च्या काळात टिव्ही वर जय मल्हार आणि दख्खन चा राजा ज्योतिबा या मालिकांची निर्मिती केली.पहिला वहिला 3डी मराठी चित्रपट काढण्याचे शिवधनुष्य उचलणारे नाव म्हणजे महेश कोठारे.


अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. अशा या कलागुणाने झपाटलेल्या धडाकेबाज हिरो ला वाढदिवसाच्या जबरदस्त, दे दणा दण शुभेच्छा.

1 टिप्पणी:

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...