बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

खाकी वर्दीतला बाप्पा........ ❤

आदरणीय महाराष्ट्र 
आणि मुंबई पोलीस बांधव
रा. प्रत्येक भारतीयांच्या
मनामनात ❤

स. न. वि. वि. 
पत्र लिहण्यास कारण की, 

कालच गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. पण बाप्पाला निरोप देताना जेव्हा डोळे मिटले तेव्हा बाप्पांनी एक गोष्ट सांगितली..... अरे मी जाईन... पुढच्या वर्षी परत येईल. पण माझं प्रतिबिंब तुमच्या जवळ तुमची सेवा, काळजी, जबाबदारी आणि तुमचे संरक्षण नेहमीच करत आले आहे आणि यापुढे ही करत राहिल. 
ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस...... 

करोना च्या सुरुवातीच्या काळात रशियात काही तरी 600 सिंह रस्त्यावर सोडले अशी अफवा आली होती.....शेवटी परदेश म्हणल्यावर अफवा च ती....
पण..... 
आमच्या महाराष्ट्रामधील  सगळे निधड्या छातीचे सिंह आमचे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस करोना च्या महामारीसोबत लढुन नागरिकांचे संरक्षण करीत होते. फक्त संरक्षण नव्हे ज्या लोकांना अन्न मिळत नव्हते त्या गरजूंना सुध्दा घासातला घास आमच्या  पोलिस बांधवांनी दिला...
ज्या वेळी भले भले स्वताला रथी महारथी म्हणवणारे, महामारीमुळे भीतीने घरात लपुन बसले होते त्या वेळी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस पोलिस आणि आपले डाॅक्टर , हाॅस्पिटल आणि सफाई कर्मचारी आणि जनसेवक करोना च्या महामारीशी निर्धाराने लढत होते. पण पहिल्या फळीतला महायोध्दा म्हणजे आमचे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस.
ज्या ज्या वेळी मनुष्यप्राण्यावर संकट धावुन येते. त्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता धावून जाणारी व्यक्ती म्हणजे  पोलिस बांधव. 26/11 चा हल्ला याचे उदाहरण म्हणता येईल. 

  करोनाच्या लढाईत आपल्या कार्याला आणि शौर्यालाकडे पाहुन बाहुबली मधला एक संवाद नक्कीच आठवतो.

उस मृत्यु को मारने जा रहा हूँ मैं
मेरी माँ और मातृभूमि को कोई नीच पापी छु नहीं
सकता....
उनकी छाती चीरकर उन सबको ये कहने जा रहा हूँ मैं....
मेरे साथ आएगा कौन ?

अशा आमच्या मनुष्यरुपी सिंघम बाप्पा चा आम्हाला फक्त गर्व नाही तर  मनापासून अभिमान आहे. 

सर्व महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस बांधवांना समर्पित

कळावे. 


प्रेषक
आपला अभिमान असणारा 
एक भारतीय नागरिक

धन्यवाद


संकल्पना आणि लेखन
अॅड गिरीश  उज्वला मधुकरराव भोसले
मांजरी बुद्रुक, 9518553911

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...