पुण्याचे सुपरहिरो- भाग 1
सुपरहिरो म्हणलं की बाॅलीवुड, हाॅलिवुड मधले दृश्य आठवतात. पण ज्या वेळी जगावर महामारीचं संकट आलं त्या वेळी काही जणांनी सुपरहिरो ना लाजवेल असं कार्य केल त्यांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पण त्यांचे कार्य पाहुन त्यांना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न.
साधारणपणे 22 मार्च पासुन लाॅकडाऊन ला सुरवात झाल्यापासून ते आजतागायत पुणे शहरातील एक तुमच्या आमच्या सारखाच एक युवा तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या संघटनेच्या आणि मित्रांच्या मदतीने पुणे शहरातील गोर गरीब आणि गरजवंत नागरीकांना प्रेमाने 2 घास भरविण्याचे आणि फुडपॅकेट्स पोहचविण्याचे काम न थकता, न थांबता, पावसाची तमा न बाळगता अविरतपणे करीत आहे.
"नाव सचिन भारती शिवाजीराव जामगे."
आपल्या संपुर्ण नावातच क्रिकेटच्या देवाचा,आपल्या भारत देशाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंश लपलेला असलेल्या या सुपरहिरोने आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करून एक उत्तम आदर्शच आपल्या समोर उभा केलेला आहे.
अत्यंत सामान्य घरातला तरुण..... पण भल्या भल्यांना तोंडात बोट घालायला लावेल एवढी मदत या तरुणाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणेकरांना केली आहे. साधारणपणे 6 लाखा पेक्षा जास्त फुड पॅकेट्सचं वाटप आणि 15 हजार पेक्षा जास्त किराणा सामानाच्या किट चे वाटप आतापर्यंत आपल्या आणि आपल्या सहकार्यांच्या मार्फत करण्यात आले. ज्या वेळी एखाद्या सामान्य कुटुंबावर भुक कशी भागवायची हा प्रश्न उभा राहिला त्या वेळी एक पुणे शहरात एक सुपरहिरो अवतरला आणि त्याने अविरतपणे पुणेकरांची सेवा केली तो सुपरहिरो म्हणजे "सचिन आण्णा जामगे".
कुठल्याही पक्षाचा अथवा राजकीय नेते मंडळींचा कार्यकर्ता नसलेल्या या सुपरहिरोने गणेशोत्सव काळात एक नवीन संकल्पना आपल्यासमोर आणली. अरसेनिक अल्बम 30 च्या हजारो गोळ्या आणि हजारो मास्क चा नैवैद्य गणपती बाप्पा मंडळ आणि ट्रस्टला अर्पण करून तो पुणे शहरातील नागरिकांना वाटण्यात आले. एक अफाट कल्पनाशक्ती चे साक्षात कृतीत रुपांतर करण्याचे एक मुर्ती मंत उदाहरण च म्हणावे लागेल.
आपले कार्य एका ब्लॉग अथवा एखाद्या लेखात पुर्ण होईल असे नक्कीच नाही. पण आपण आणि आपले सहकारी बांधव तसेच वंदे मातरम संघटना,युवा फिनिक्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने केलेल्या एका भुतो न भविष्यातो कार्याला समस्त पुणेकरांच्या वतीने सलाम...... सलाम...... सलाम
टिपण्णी - सचिन जामगे यांचे कार्य पाहण्यासाठी एकदा नक्कीच "सचिन भारती शिवाजीराव जामगे" यांच्या फेसबुक प्रोफाईला अवश्य भेट द्या.
धन्यवाद.
विशेष सहकार्य
अक्षय वाडकर
लेखक
गिरीश भोसले
सचिन आण्णा जामगे आणि माझा परीचय नसुन केवळ त्यांनी या महामारी च्या केलेल्या अभुतपूर्व कार्याचा गौरव म्हणून सदर लेख लिहिला आहे.
योगायोग म्हणजे आम्ही दोघे स. प. महाविद्यालयाचे विद्यार्थी... आजपण स.प.महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियमित साफसफाई करून आरती करणारे सचिन आण्णा जामगे आठवतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा