आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007 & भाग 2
कभी कभी जितने के लिए कुछ हारना भी पडता है.....
और हारकर जितने वाले को बाजीगर कहते है.
सूपर 8 मध्ये पाकिस्तान संघाला हरवून भारतीय संघाने दिमाखात प्रवेश केला होता पण न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या मातब्बर संघासोबत भारतीय संघाला टक्कर द्यायची होती.
दिनांक 16 सप्टेंबर.
जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे भारतीय संघाचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना न्यूझीलँड विरुद्ध होता. भारतीय संघाने टाटा जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण चा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड संघाने धुव्वाधार फलंदाजी करताना 190 धावा केल्या.
भारतीय संघाची सुरवात एकदम धुव्वाधार फलंदाजीने झाली. विरेंद्र सेहवाग च्या 40 धावा आणि गौतम गंभीरच्या अर्धशतकामुळे भारतीय संघ सुरवातीला सुस्थितीत होता. पहिली विकेट 6 व्या ओवरला 76 धावांवर पडल्या नंतर भारतीय संघाचा ठराविक अंतरावर विकेट पडल्या. भारतीय संघाचे 4 फलंदाज तर दोन आकडी धावांचा संख्या सुध्दा गाठू शकले नाही. आणि भारतीय संघाचा केवळ 10 धावांनी पराभव झाला. डॅनियल विटोरी ने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करुन 4 विकेट घेतल्या.
पण काही वाघ जर दोन पावले मागे सरकतो तो पळुन जाण्यासाठी नव्हे तर झडप घालण्यासाठी हे वाक्य भारतीय संघाने खरे करून दाखवले.
एखाद्या संघाला पराभव झाल्यानंतर त्याने घेतलेल्या गरुड झेपेचे अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे भारतीय संघाचा या विश्वचषकामधील प्रवास.
या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असला तरी ,
कभी कभी जितने के लिए कुछ हारना भी पडता है.....
और हारकर जितने वाले को बाजीगर कहते है.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा