बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

पुण्याचे सुपरहिरो - भाग 2 अॅड. रुपालीताई पाटिल

पुण्याचे सुपरहिरो - भाग 2

एक छोटा अणु काय करू शकतो हे हिरोशिमा आणि नागासाकी वर पडलेल्या अणुबाँब ने दाखवून दिले. पण एक महिला चुकलेल्या व्यवस्थेला एका क्षणात कशा प्रकारे जागेवर आणु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुपालीताई पाटिल.... 

4-5  दिवसापूर्वी एक विडिओ क्लिप फेसबुक वर पाहण्यात आली. त्याची थोडी माहिती घेतली असता असे कळाले की, करोना च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. जम्बो सेंटरच्या प्रवेशद्वारावर बाऊन्सर नेमण्यात आले होते. पण अशा फक्त भव्य दिव्य दिसणारे या बाउंसरांना न जुमानता एक वाघिण सरळ आत शिरली.... जम्बो कोविड सेंटरच्या समन्वय समिती ची मिटिंग चालू असताना त्यांनी बाऊन्सर गेटवर असल्याचा जाब आणि कारण विचारले. आणि काही वेळातच समन्वय समितीला बाऊन्सर प्रवेशद्वार वरुन हटवावे लागले. याचे संपुर्ण श्रेय जाते ते केवळ रुपालीताई पाटिल यांना. 

जम्बो कोविड सेंटर हे सामान्य पुणेकरांसाठी आहे. तिथे येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य ती सेवा मिळालीच पाहिजे या हेतूने रुपालीताई यांनी जे पाऊल उचलले ते योग्यच आहे. सामान्य रुग्णांसाठी बांधलेल्या या कोविड सेंटर च्या गेटवरील बाऊंसर गेट ऊघडत नसल्यावर डायरेक्ट गेट वर चढुन आत घुसुन आयुक्तांना जाब विचारणारी तरुणी म्हणजे रुपालीताई पाटिल, ऋषिकेश बालगुडे आणि त्यांचे सहकारी.
पण व्यवस्थापनाच्या कारभाराविरोधात आंदोलन केले कारणास्तव रुपालीताई यांना अटक करण्यात आली. पण त्यांच्या वर केलेली स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने साफ फेटाळून लावली. पुणेकरांना दिलासा आणि मदत मिळवुन देणारे कार्य केल्यानंतर माझ्या वर कारवाई होणार असेल तर जनतेशी बांधिलकी जपण्यासाठी आम्ही काम करणारंच , जीव गेला तरी बेहत्तर अशी  रोखठोक भुमिका मांडणारी पुणे शहराची वाघीण रुपालीताई पाटिल आम्हां पुणेकरांना आपला सार्थ अभिमान आहे. 
झाशीची राणी ची भुमिका केल्याने कोणी राणी लक्ष्मीबाई होत नाही. आधुनिक जगातील राणी लक्ष्मीबाई तर ती आहे जी आपल्या समाजातील लोकांसाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकते.

विशेष सहकार्य
अक्षय वाडकर

लेखक
अॅड. गिरीश भोसले
रुपालीताई आणि मी दोघेही वकील क्षेत्रात असलो तरी आमचा दोघांचाही कुठलाही परीचय नाही. सदर लेख हा त्यांनी केलेल्या एक धडाकेबाज कामाच्या प्रित्यार्थ लिहलेला आहे.

३ टिप्पण्या:

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...