आज अनंत चतुर्दशी..... ज्या प्रमाणे एक लगीन घर सजवले जाते त्याचप्रमाणे आज पुणे शहराला प्रत्येक अनंत चतुर्दशीला सजवलं जायचे....
रस्त्यांवर हे भल्या मोठ्या रांगोळ्या..... गुलालाची उधळण...... ढोलाचा पहिला ठोका आणि ताशाची तर्री गाजवणारा आणि वाजवणारा बेफान झालेला वादक आणि ढोलताशा पथक..... मिरवणुकीतील आकर्षक चित्ररथ..... मंडईच्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून ते अलका टॉकीज चौका पर्यंत चा माहोल म्हणजे एक प्रकारचे स्वर्गसुखच...
पुणेकरांनी मिस तरी किती गोष्टी करायच्या......
हिराबाग ,खजिना विहिर निंबाळकर तालीम आणि हत्ती गणपती चे हलते देखावे नाहीत ना नातुबाग ची लायटिंग. बाबु गेनू मंडई आणि दगडूशेठ गणपती च्या कलाकृती नाहीत. सगळयात महत्त्वाचे म्हणजे मिरवणूका नाही ना अलोट गर्दी. रात्री 12 पर्यंत टॅक्टर वर ऊभे राहून उभे राहून बेफाम नाचणारी तरुणाई नाही.केवळ आणि केवळ शांतता.... आणि मनातल्या मनात केवळ ओक्साबोक्षी रडत असलेले गणेश भक्त. .... पुणे शहरामधली गणपती मिरवणूक आणि पंढरीची वारी मिस करणे म्हणजे या वर्षीचे सर्वात मोठे दुःखद क्षण.
देवा गणपती बाप्पा तुच धाव रे तुझ्या लेकरांच्या मदतीला..... तुच आमचा पालनहार आणि तुच आमचा आरोग्यदाता.... तुच आमचा पिता...... आणि तुच आमची माता.....
या वर्षी आम्ही पुणेकरांनी जेवढे साधेपणाने उत्सव साजरा केला आहे त्याच्या उलट पुढच्या वर्षी भव्य दिव्य ना भुतो ना भविष्यतो ऊत्सव नक्कीच साजरा करु....
मनात बाप्पा
मुखात बाप्पा
विचारात बाप्पा
कार्यात बाप्पा
जमिनीवरील एका मातीच्या कणापासून आकाशातुन येणाऱ्या पावसाच्या एका थेंबात असणारा सर्व व्यापी आपला बाप्पा....
बाप्पा आपला......
आणि
आपण बाप्पाचे
या वर्षी बाप्पा माफ कर कारण या वर्षी घेतला आहे ब्रेक...... आम्ही पुणेकरांनी....
पण पुढच्या वर्षी तुझे भक्त ऊत्सव करणार रेकॉर्ड ब्रेक ......❤️
लेखक - अॅड गिरीश उज्वला मधुकरराव भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा