भव्य म्हणजे शाहू चौक
राजर्षी शाहू चौक
सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ, छत्रपती शिवाजी
महाराज रोड, आंगरेवाडा
समोर, पुणे -2
शाहु चौक..... जरी शाहू चौक नाव एकलं तर फक्त डोळे समोर फक्त दोनच गोष्टी येतात.
1. फक्त नाव च पुरेसे आहे हे विशेषण ज्याला लागु होते असा आंग्रे वाडा.
2.आणि भव्य उपमा ज्या मंडळाला शोभुन दिसते असे राजर्षी शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,छत्रपती शिवाजी महाराज रोड रजिस्टर नंबर ई/1580
ज्या मंडळाची कलाकृती पाहताना मान वर करूनच पहायला लागतं आणि ज्या मंडळाच्या मिरवणुकीत तरुणांच्या संख्येएवढीच तुफान तरुणींची संख्या पहायला मिळणार मंडळ म्हणजे .......देखावें पासुन साऊंड पर्यंत भव्य दिव्य गाजवणारे आणि नाचवणारे मंडळ म्हणजे आपलं शिवाजी महाराज रोड वरील राजर्षी शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
1922 साली स्थापन झालेलं मंडळ पुढच्या 2 वर्षात आपलं शतक पूर्ण करत आहे त्या बद्दल मंडळाचे आणि मंडळाचे कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन.
मंडळाचे स्थापनेपासून भव्य देखावे करण्याची परंपरा असलेलअसलेल्या आपल्या मंडळाने गणेशभक्तांना आकर्षित करण्यास नेहमीच यश मिळवले आहे. आपल्या मंडळाचे सुरवातीच्या काळात लायटिंग साठी आपले मंडळ प्रसिद्ध होते. त्यांनंतर कारगिल युद्ध, समुद्र मंथन, कालियामर्दन, सिताहरण यांसारखे देखावे मंडळाने करुन गणेशभक्तांना आपल्या कडे आकर्षित करण्यासाठी भाग पाडले......
अलिकडच्या काळात अमरनाथ मंदिर,श्री क्षेत्र जेजुरी, तिरुपती बालाजी मंदिर, शिर्डी, जयपूर पॅलेस आणि पॅगोडा यांच्या सारख्या सुंदर कलाकृती करुन गणेशभक्तांना पुणे शहरातच भारतातील प्रसिद्ध देवस्थानांच दर्शन याची देही याची डोळा करून दिले. वणी देवी मंदिराचा चा देखावा ईतका सुंदर केला होता की अनेक सेलिब्रिटींनी त्या वेळी आवर्जून उपस्थिती लावली होती.
गावामधील ऊरूस हा पुणे शहरात जिंवत ठेवण्याच श्रेय आपल्या मंडळाला जाते. आजपण त्या ढोल ताशा स्पर्धची आवर्जून आठवण येते. निराधार आणि अनाथ मुलांसोबत दहीहंडी साजरा करुण व त्यांना गरजोऊपयोगी वस्तू देऊन त्यांच्या मोठ्या भावाची सावली देणारे तरुण कार्यकर्ते सुध्दा या मंडळात आहे. समाजा समोर एक नवीन आदर्श या कार्यक्रमातुन आपल्या मंडळाने ठेवलेला आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे
आपल्या मंडळाचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे मंडळाचे गणेश मूर्ती. अगदी सुंदर आणि देखणी असलेली मुर्तीचे डोळे अप्रतिम. जणू काही बाप्पा आपल्याकडेच पहात आहे का काय असा भास भक्तांना होतो.
राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला शोभेल असे आपल्या मंडळाचे नाव, कार्य आणि आणि कलाकृती मुळेच भव्य म्हणजे राजर्षी शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हि साजेशी अशी उपमा आपल्या मंडळाला शोभुन दिसते.
पुढच्या वर्षी आणि शतकोत्तर वर्षी आपल्या मंडळाकडून एक सुंदर कलाकृती पहायला आणि एक जबरदस्त साऊंड च्या आवाजावर पाय थिरकायला आम्ही पुणेकर तरुण एका पायावर तयार आहोत,
अशी सदिच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद
कळावे.
राजर्षी शाहू चौक
सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ, छत्रपती शिवाजी
महाराज रोड, आंगरेवाडा
समोर, पुणे - 2
प्रेषक
एक पुणेकर तरुण
जो आपल्या मंडळाचा,
कलाकृती चा आणि साऊंड
सिस्टीम चा फॅन आहे
पुणे शहरातील ज्या मंडळांनी देखावे आणि डेकोरेशन ची ख्याती साता समुद्राच्या पलीकडे नेऊन महाराष्ट्रातील गणेशभक्तांना पुण्यात येऊन देखावे आणि डेकोरेशन पहायला आनंदाने भाग पाडले त्या मंडळांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी.❤️
संकल्पना
आकाश मुसळे
लेखन
गिरीश भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा