जय शार्दुल........
पुणे शहर गणेशोत्सवामध्ये देखाव्यांसाठी प्रसिद्ध तर मुंबई शहर ऊंचच ऊंच विविध प्रकारच्या गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध.......
प्रत्येक मंडळाचे काही ना काही वैशिष्ट्ये असतात. पण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सामाजिक वारसा जपणारे आणि पंचाहत्तरी च्या उंबरठ्यावर असणारे एक मंडळ आहे.
शार्दुल म्हणजे हिंदी भाषेत अर्थ पहायचा झाला तर "सगळ्यात चांगला" . आपल्या नावाला साजेसे असलेले शार्दुल मित्र मंडळ ,गुरुवार पेठ हे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाचे आणि विविधतेतुन एकता हा संदेश देणारे महत्त्वाचे मंडळ आहे.भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लालबाग च्या राजा मंडळाची 1942 सालची मुर्ती आणि शार्दुल मित्र मंडळाची मुर्ती अगदी जुळ्या भावांसारखे नखशिखांत एकसारख्या आहेत.
या मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे.
मंडळाचे गणेशमुर्ती ला विविध प्रकारच्या वेशभूषा करता येणारे समस्त भारतातील एकमेव असे हे मंडळ आहे.
मुर्तीला वैविध्यपूर्ण पोषाखाचा पेहराव करणे हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य.
छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, वीर तानाजी मालुसरे, बाळ गंगाधर टिळक, मल्हारी मार्तंड खंडोबा, धनगर पेहराव, धोती पायजमा, चाचा नेहरू, पाटिल, व्यापारी या सर्वांचा पेहराव केवळ एकाच गणेशमूर्ती ला करण्यात आलेला आहे. आणि आजही सामाजिक संदेश देणारी परंपरा अविरतपणे चालू आहे. या गोष्टींचे संपुर्ण श्रेय हे बाबासाहेब चौधरी ज्यांना लाडाने आणि मानाने सगळे जण काका म्हणतात त्यांना जाते. मंडळाचे लहान थोर कार्यकर्ते ही त्यांना या कामात मदत करतात. मंडळाला सामाजिक आणि पौराणिक हलते देखाव्यांची सुध्दा परंपरा आहे. त्यामुळेच पुणे शहरातील आपले वेगळे पण जपणारे शार्दुल मित्र मंडळ आपल्या पुणे शहरातील गणेशोत्सवात भर टाकत आहे......
गणेशभक्तांना दरवर्षी मंडळाची नवनवीन पेहरावातील मुर्ती व सुंदर देखावे पहायला मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद
लेखन
गिरीश भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा