प्रति,
प्रिय,
हिराबाग मित्र मंडळ
टिळक रोड, पुणे 30
पत्र लिहण्यास कारण की ,
पहिले तुम्ही ओळखलं का सांगा अगोदर मला? अहो मी तोच आहे......तुमच्या मंडळाचा आणि दरवर्षी गणपती मधले देखावे पहाण्यासाठी ऊतवळा असणारा लहान पोरगा. पण तो लहान पोरगा आता मोठा झालाय बरं का. 17-18 वर्षा पूर्वी तुमचे देखावे पाहण्यासाठीचा आसुसलेला चातक पक्षी असलेला मी आज पण तुमचे पाहिलेल्या चित्तथरारक देखावे चा भक्त आहे..... ❤
आज पण मला तुमचे, नरसिंह अवतार, गणरायाची जलआरती, गणेश जन्म, हनुमानचे महाऊड्डाण, दुर्गा माता चा महाकाली अवतार, श्रीकृष्ण लीला, हे देखावे आवर्जून आठवतात. महाभारत आणि रामायणातील प्रसंगावर आधारित असलेले पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि उत्तम देखावे होते...
श्रीकृष्णाचे विराट रुप हा मला आठवत असलेला तुमचा पहिला देखावा.
लहानपणी आमचे चुलते दरवर्षी गणपती पहायला नेत असत. त्या वेळी पहिला देखावा कुठला पाहणार, तर हिराबाग मित्र मंडळ हे ठरलेलं गणित.....चुलत्यांच्या खांद्यावर बसुन आणि तुफान गर्दीत हाताला घट्ट पकडून पाहिलेले देखावे हे आजसुद्धा मनात साठवून ठेवले आहेत. चुलत्यांनी देखावे दाखवल्यानंतर परत आईवडिलांपाशी केलेला तुमचा देखावे पाहण्यासाठी चा हट्ट अशा एक ना अनेक आठवणी आहेत. जसे जसे तरुण झालो तसे मित्रांबरोबर गणपती पहायला जायला लागलो. पण गणित तेच ठरलेलं. पहिला मान हिराबाग मित्र मंडळाचा .
नरसिंह अवतार आणि कालीमातेचा अवतार ईतका अप्रतिम केला होता की लहान मुलं त्यां मुर्तींना पाहुन आणि आवाज ऐकून घाबरायचे. राहुल सोलापूरकर काकांचा निवेदनाचा आवाज तर अजुन पण आठवतो. हनुमानचे संजिवनी आणण्यासाठी केलेले उड्डाण तर एकच नंबर होतं.... मांडवासमोर असलेल्या झाडाचा किती सुंदर वापर केला होता तुम्ही. "तो देखावा संपल्यानंतर पवनपुत्र हनुमान की जय" चा आवाज ठोकणारा तो तरुण पण मीच बरं का.... ❤
पण साधारण पणे 3,4 वर्ष झाले तुमचे चित्तथरारक देखावे पहायला नाही मिळाले ओ. कारण माहित नाही पण आता आपल्या मंडळाचे देखावे केले जात नाही... गणेशोत्सव असो किंवा नसो टिळक रोड वरुण जाताना तुमच्या देखावे ची आठवण नक्की येते... पण तुमच्या चित्तथरारक देखाव्यांची उणीव जाणवतेच.... यावर्षी तर करोना च्या संसर्गामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे पण पुढच्या वर्षी तुमचे चित्तथरारक देखावा पाहण्यासाठी आतुर असलेला एक तूमचा निस्सीम चाहता तुमची वाट पाहतोय रे..... आणि माझ्या सारखे असंख्य पुणेकर आणि महाराष्ट्रातुन गणपती पहायला येणारे गणेशभक्त सुध्दा माझ्या सारखीच वाट पहात आहेत तुमच्या देखाव्यांची....
परत या ना , तोच राहुल सोलापूरकर काकांचा आवाज आणि चित्तथरार देखाव्यांची परंपरा पुन्हा घेऊन या ना.
तुमच्या देखाव्यांची वाट पाहत
असलेला तुमचा चाहता
प्रेषक,
गिरीश मधुकर भोसले
रा. पुणे शहर
प्रति,
हिराबाग मित्र मंडळ
हिराबाग चौक, टिळक रोड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा