प्रति,
सेवा मित्र मंडळ........
258, शुक्रवार पेठ, सेवा
मित्र मंडळ चौक, पुणे 2
पत्र लिहण्यास कारण की,
आपल्या पुणे शहराला गणेशोत्सवामध्ये देखाव्यांची परंपरा आहे. पण या देखाव्यांतुन समाजप्रबोधन करणारे अग्रगण्य असणारे मंडळ म्हणजे आपलं सेवा मित्र मंडळ.
काही मंडळाच्या नावातच त्यांच कार्य नमूद केलेले असते. याचं सुंदर उदाहरण म्हणजे शुक्रवार पेठेतील आपले सेवा मित्र मंडळ. सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य असलेले मंडळ समाजप्रबोधन पर काम नेहमीच करत आलेले आहे आणि आजही अविरत पणे चालू आहे. करोना संसर्गामुळे सगळीकडे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असताना सेवा आॅनलाईन महा गणेशोत्सव 2020 हा उपक्रम मनापासून कौतुक करण्यासारखा चालू केला आहे. शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा ईतिहास, प्रबोधन करणारे प्रवचन, नवीन उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आॅनलाईन संवाद, शिवव्याख्यान, व शौर्यगाथा असे एक ना अनेक कौतुकास्पद उपक्रम आपण आॅनलाईन पध्दतीने राबवत आहात. केवळ गणेशोत्सव काळात समाजसेवेचा संदेश न देता वर्षभर समाजउपयोगी उपक्रम कसे राबवता येतील याकडे आपल्या मंडळाचे विशेष लक्ष असते.
पाणी, आत्महत्या, शिक्षण, वाहतूक समस्या, दहशतवादाविरोधात लढाई, असे सामान्य माणसाच्या आयुष्यातील साधे साधे पण अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण आपल्या सामाजिक देखाव्यांच्या आणि मिरवणुकीतील चित्र रथांचा माध्यमातून मांडले आहे.
अंध भगिनींचा मंडळातर्फे आयोजित केलेला विवाह, शहीद पोलीस आणि सैनिक बांधवांच्या परिवार सोबत साजरे केलेले उपक्रम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी , लहान मुलांसाठी मेळावे, अंध अपंगांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचे, अनाथ बालकांसाठीचे मेळावे असे शेकडो उपक्रम आपल्या मंडळातर्फे वर्षभर अविरतपणे सुरू असतात. या उपक्रमांचे कौतुक करेल तेवढे कमी आहे. याच कारणांमुळे आणि आपल्या समाज सेवेचा वारसा निरंतर चालवत असल्या कारणाने आपल्या सेवा मित्र मंडळाने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहे.
आपल्या मंडळाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मंडळाचे कुठल्याही कार्यकर्त्या ने समाजसेवक, जनसेवक नावाचा कुठलाही टॅग न लावता अत्यंत साधेपणाने आपले कार्य निरंतरपणे करत वारसा जपलेला आहे. एक पुणेकर म्हणून आम्हाला आपल्या मंडळाचा आणि आपल्या मंडळाचे लहान थोर कार्यकर्ता बांधवांचा आम्हाला एक भारतीय नागरिक म्हणून मनापासून आनंददायीअभिमान आहे.
पत्राच्या शेवटी फक्त एकच सदिच्छा व्यक्त करतो की, आपल्या मंडळाकडून असेच नवनवीन उपक्रम आणि देखावे तसेच मिरवणुकीत पुस्तक रथासारखे संदेश देणारे उपक्रम, आपल्या भारतीय बांधवांना पहायला मिळो आणि देशाला गरज असलेल्या सेवादुतांची फौजेची नवीन पिढी आपल्या सेवा मित्र मंडळाचा माध्यमातून तयार होत राहो....
कळावे,
धन्यवाद.
प्रति,
सेवा मित्र मंडळ........
258, शुक्रवार पेठ, सेवा
मित्र मंडळ चौक, पुणे 2
प्रेषक,
आपल्या मंडळाचा आणि
कार्यकर्ते मंडळींच्या कार्याचा
सार्थ अभिमान असलेला
एक पुणेकर
टिप्पणी- सदर लेख हा आपल्या मंडळाचे कार्य पहात आलेल्या पुणेकर नागरिकांच्या नजरेतून लिहलेला आहे. आपल्या मंडळाचे कार्य अगणतिक असल्याने ,सगळ्या उपक्रमांचा उल्लेख करणे शक्य नसल्याने मंडळाचे ठराविक उपक्रम नमूद केलेले आहे.
संकल्पना आणि लेखन
गिरीश भोसले
दिनांक 25.8.2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा